Monday, June 21, 2010

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...


कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...




लवकर दे गं उत्तर...

कॉलेजचे गेट।
झाली तेथे भेट।
घुसलीस मनात थेट।
देशील का मला डेट?

मी रोगी तु दवा।
तु फ़ुगा मी हवा।
तु चुल मी तवा।
सांग तुला मी हवा?

तु तपकीर मी चिमुट।
तु साडी मी सुट।
मी मोजा तु बुट।
जमेल मेतकुट

तु धाप मी छाती।
मी शनी तु साडेसाती।
मी भुत तु भानामती।
जुळतील का नाती?

मी पेट्रोल तु गाडी।
मी गवत तु काडी।
मी विचार तु नाडी।
जमेल का जोडी?

मी वरवंटा तु पाटा।
तु संगणक मी डाटा।
तु टेल्को मी टाटा।
होतील एक वाटा?

तु वाजंत्री मी ताशा।
तु मिठाई मी माशा।
तु बोली मी भाषा।
ठेवु का मी आशा?

मी पाणी तु घागर।
मी चहा तु साखर।
जोडा जमेल का सत्वर?
लवकर दे गं उत्तर...
लवकर दे गं उत्तर...

1 comment:

  1. कृपया ह्या कवितेचे कवी कोण, त्यांचे नाव सांगा

    ReplyDelete