Thursday, June 10, 2010

चॅटिंगसाठी खुश्कीचे मार्ग!

सध्या इंटरनेटवर काम करताना चॅटिंगवर जास्त भर दिला जातो. माहितीच्या या महाजालातूत माहिती मिळविण्याऐवजी मित्रमैत्रिणीशी जीटॉक अथवा याहू मेसंेजर अथवा एमएसएन मेसेजरवरून गप्पा मारण्यात अनेकांचा वेळ जातो. हा इंटरनेटचा दुरुपयोग आहे असे म्हटले तर काहीजणांना राग येईल. पुढेमागे 'इंटरनेट : शाप की वरदान' असा विषय निबंधासाठी शाळेत आला तर आशर्य वाटायला नको. असो.

हे चॅटिंग स्वत:च्या मालकीच्या कम्प्युटरवरून होते आहे तोपर्यंत फारसा धोका नाही. परंतु, दुसऱ्याच्या मशीनवरून करत असाल तर तुमचे संभाषण अथवा मेल पासवर्ड तिथे सेव्ह होण्याची शक्यता असते. यासाठी एक काम करा. 'मीबो डॉट कॉम'वर जा. कोणताही ब्राऊझर ओपन करा आणि 'मीबो डॉट कॉम' टाइप करा. याहू, गूगल टॉक, मायस्पेस आणि एमएसएन असे चारही मेसेंजर एकदम दिसतील. तुमचे अकाऊंट जिथे आहे तिथे लॉगऑन करा आणि चॅटिंग करा. तुम्ही एकदा का ब्राऊझर क्लोज केलात की आधीचे सर्व रेकॉर्ड निघून जाईल. मग आपल्या मागावर कोणी आहे का याची काळजी करण्याचे कारण नाही.

आपण काम करताना अनेक फाइल्स सेव्ह करत असतो. बऱ्याच काळानंतर त्या फाइल्स आपल्याला नकोशा होतात किंवा त्यांची खरोखरच आवश्यकता नसते. अशा वेळी त्या आपण डिलिट करायला जातो. परंतु असा मेसेज येतो की 'यू कॅन नॉट डिलिट धिस फाइल बिकॉज इट इज इन यूज'. आपण चक्रावतो. कारण आपण ती फाइल वापरत नाही, तरी ती वापरात आहे असे कम्प्युटर साांगतो. अशा वेळी कंट्रोल ऑल्ट डिलिट एकदम दाबून विंडोज टास्क मॅनेजर ओपन करा. ती विशिष्ट फाइल वापरात आहे का ते बघा. कारण तुमच्या नकळत बॅकग्राऊंडला शेकडो फाइल्स कार्यरत असतातच. विंडोजच्या अशा फाइल्स चालू राहणे अपरिहार्यच असते. टास्क मॅनेजर ओपन झाला तर प्रोसेसेसवर क्लिक करून कायकाय चालू आहे ते पाहा. तुम्हाला नको असणारी फाइल क्लिक करून 'एंड प्रोसेस' असे म्हणा. टास्क मॅनेजर बंद करा आणि मग तुम्हाला जी फाइल डिलिट करायची आहे ती डिलिट करा. एवढे करूनही ती डिलिट होत नसेल तर मशीन रिस्टार्ट करून पाहा. या संदर्भात 'अनलॉकर' नावाचा चकटफु प्रोग्राम डाऊनलोड करता येतो. हा प्रोग्राम तुम्हाला हवी असलेली फाइल रिलिज करतो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. टास्क मॅनेजरमधील कोणती प्रोसेस थांबवायची याची पक्की माहिती असल्याशिवाय ती थांबवायच्या भानगडीत पडू नका. अन्यथा विंडोज सिस्टिम बिघडण्याची शक्यता असते.

आपण एखाद्या ब्राऊझरमध्ये काम करत असताना तो अचानक स्लो चालायला लागतो आणि मग 'काल तर बरा होता', असे म्हणण्याची पाळी येते. यातले गुन्हेगार हे ब्राऊझरमधले अॅडऑन्स आहेत. हे अॅडऑन्स पी असले तरी ब्राऊझरचे वजन वाढवतात. एखाद्या वाहनात जिथे पाच माणसे बसू शकतात तिथे भरपूर वजनाची दहा माणसे बसविली की अनावश्यक वजनामुळे गाडी स्पीड घेत नाही. तसेच ब्राऊझरचे आहे. म्हणून अनावश्यक अॅडऑन्स डिलिट करणे आवश्यक आहे. तुम्ही आयई वापरत असाल तर एक काम करा. टूल्सवर क्लिक करून मॅनेज अॅडऑन्स आणि मग एनेबल ऑर डिसेबल अॅडऑन्सवर जा. तुमच्या ब्राऊझरमध्ये कोणकोणते प्लगइन्स वा इतर प्रोग्राम डाऊनलोड झाले आहेत ते पाहा. अनावश्यक प्रोग्राम डिसएबल करा. ते डिलिट करण्याची गरज नाही. मोजके आवश्यक अॅडऑन्स ठेवले तर ब्राऊझर पुन्हा वेगाने काम करायला लागेल.

2 comments:

  1. जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं .......


    साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
    हसावंसं वाटलं तर हसायचं
    रडावंसं वाटलं तर रडायचं

    जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं
    प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं
    ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
    ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

    मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे
    आपण जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे
    आपण करावंसं वाटेल ते करायचं
    जगावंसं वाटेल तसं जगायचं...

    असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं
    जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं!
    आपणच आपलं चांदणं बनून
    घरभर शिंपत रहायचं

    साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
    हसावंसं वाटलं तर हसायचं
    रडावंसं वाटलं तर रडायचं

    regards
    Sagar Khairnar

    ReplyDelete
  2. मैत्री हा असा एक धागा,
    जो रक्ताची नातीच काय
    पण परक्यालाही खेचून
    आणतो
    आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
    आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला
    सामावून घेतो.

    मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
    त्याच्यासाठी
    असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

    काहीजण मैत्री कशी करतात?
    उबेसाठी
    शेकोटी पेटवतात अन
    जणू शेकोटीची कसोटी पहातात.
    स्वार्थासाठी मैत्री
    करतात अन
    कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
    शेकोटीत अन मैत्रीत फ़रक
    काय?
    दोन्हीपण एकच जाणवतात.

    मैत्री करणारे खूप भेटतील
    परंतू
    निभावणारे कमी असतील
    मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

    कधी
    भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
    कधी प्रेमाची बात, अशी असते
    निस्वार्थ
    मैत्रीची जात

    या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
    नेत्रकडा
    ओलावल्या अन शब्द ओठांवरच
    अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
    तो दूर
    गेल्यावर कळला.

    आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
    सुख-दु:खाच्या
    क्षणी आपल्या मनाला जपणारं
    जीवनाला खरा अर्थ समजावणारं
    काय चिज असते
    नाही ही मैत्री??

    ReplyDelete