Wednesday, June 30, 2010

Computer ke saath dil saala phir takkar kha gayaa...!!!



appun jaise tappori s/w Engg. ko kya maalum...
saala programming kis chidiya kaa naam hai...

copy paste kaa kaam miltaa hai bass appun khush...!!!

fir yeh coding kaa lafdaa locha kaiko?

are kaiko ?

arre kaiko re?

fir ek din boleto appun ko project mila.....

ya haaaaaaaaaa!!!!

saala appun ka khopdi chakkar kha gaya ......

computer ke saath dil saala takkar kha gayaa...!!!

din bhar appun computer ke aagge...

koi lafdaa nahi kuch nahi...

Boss bola kya be munna saala tu bhi programmer bann gaya...!!!

ye munnabhai kya coding bana rela hai baap...!!!

(fir ...? fir kya huwa..?)

fir ek din appun ne coding poora kar diya...

form poora karke appun ne testing ko bhej diya...!!!

lagataa tha ab appun kaa kaam khatam ho gaya ......!!!

par module me issues dekhake sala appun darr gaya ....!!!

appun ke saamne tester ne mere coding me ki galtiyaa nikali... aapun ke coding ki poori waat laga di.... appun udharich khadaa thaa... par
appun kuch nahi bola... kaiko bolega? kaiko...?

saala ek, ek kaam kiya thaa... usme bhi itne bugs...

par appun ek aansu nahi roya...

kaiko royega...?

kaiko..?

saala appunich yedaa thaa naa...!!!

agale din se phir wohi life chalu...

wohi mails forward karnaa, wohi messages, wohi template, wohi assignments... saala itnaa mails forward kiya...itnaa mails forward kiya... log samze mail server down hoyega... bhoolneka hai bhoolneka hai par kya karega...!!!

training milke bhi jab kaam nahi miltaa hai...

haa thoda bore huwa par chaltaa hai...

(phir ...? phir kya huwa..?)

fir ...?

fir kya...?

fir agale din appun ko aur ek project mila...!!!

shaappak...

saala appun ka khopdi phir chakkar kha gaya .......

computer ke saath dil saala phir takkar kha gayaa...!!!

Monday, June 21, 2010

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...


कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...




लवकर दे गं उत्तर...

कॉलेजचे गेट।
झाली तेथे भेट।
घुसलीस मनात थेट।
देशील का मला डेट?

मी रोगी तु दवा।
तु फ़ुगा मी हवा।
तु चुल मी तवा।
सांग तुला मी हवा?

तु तपकीर मी चिमुट।
तु साडी मी सुट।
मी मोजा तु बुट।
जमेल मेतकुट

तु धाप मी छाती।
मी शनी तु साडेसाती।
मी भुत तु भानामती।
जुळतील का नाती?

मी पेट्रोल तु गाडी।
मी गवत तु काडी।
मी विचार तु नाडी।
जमेल का जोडी?

मी वरवंटा तु पाटा।
तु संगणक मी डाटा।
तु टेल्को मी टाटा।
होतील एक वाटा?

तु वाजंत्री मी ताशा।
तु मिठाई मी माशा।
तु बोली मी भाषा।
ठेवु का मी आशा?

मी पाणी तु घागर।
मी चहा तु साखर।
जोडा जमेल का सत्वर?
लवकर दे गं उत्तर...
लवकर दे गं उत्तर...

Thursday, June 17, 2010

एक दिवस............

एक दिवस............
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

Tuesday, June 15, 2010

आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस...



आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती िहरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस िचंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे िचखलात
पण आईच्या कष्टाचे िवचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या िवजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवता आठवता मग आसवांनी िभजून जातो रुमाल

Monday, June 14, 2010

एक क्वार्टर कमी पडते...

एक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही


सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते


पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते


पीण्याचा कार्यक्रम पीणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय दारु दारु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते


पीणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे


प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते


चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
PHD केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते


फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

Sunday, June 13, 2010

माझी पहिली ओळख...



राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्‌ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना माझ्या मनात येत नाही ही माझी दुर्बलता वाटत असे. पण राजला भेटल्यावर माझ्या मनातली भावना न्यूनगंडासारखी होती, ती माझ्या शक्तिस्थानासारखी वाटू लागली.

राजमध्ये प्रचंड करिष्मा आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा राजचा करिष्मा किंवा राजची ती जादू योगायोगाने किंवा अपघाताने आलेली गोष्ट नाही. राज वयाच्या तेवीसाव्या वर्षापासूनच राजकारणात आहे. तेव्हापासून त्याने कण-कण करून माणसं जोडलेली आहेत. त्यांची काळजी केलेली आहे. आजही राज जेव्हा बाहेर कुठेही किंवा दौर्‍यावर जातो, तेव्हा बरोबरच्या माणसांची आधी काळजी घेतो. त्यांची सोय नीट होते आहे की नाही यावर त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. राज आक्रमक राजकारण करतो किंवा त्याची वक्तृत्वकला तडफदार आहे म्हणून केवळ जादू पसरत नाही, तर सोबतच्या माणसांची तो पराकोटीची काळजी घेतो. जनतेला असा नेता आवडला तर नवल काय? व्यवसायामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रकारामुळे देशातले अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मी पाहिले. बहुतेकांना आपल्या बायका-मुलांपलीकडे कुणी माणसं आपल्यासोबत असतात आणि त्यांची काळजी आपणच वाहायला हवी याची जाणीवच नसते. राज या सार्‍यांपेक्षा अगदी वेगळा आहे.

नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीसाठी संपूर्ण शिवसेना कोकणात उतरली. त्या वेळी राजचा मुक्काम कणकवलीच्या हॉटेल शर्मिलामध्ये होता. तिथे परिस्थिती अशी होती की माणसं भरपूर होती आणि रुम्स कमी होत्या. राणेंनी मतदारसंघातील सर्व हॉटेल्स आधीच बुक करून ठेवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भलतीच पंचाईत झालेली होती. अशा वेळी राज हॉटेलमध्ये आपल्या खोलीत जास्तीत जास्त जणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्या वेळेला शिवसेनेचे अनेक बडे नेते आपली हॉटेलमधली सोय कशी अधिक 'फुलप्रूफ' होईल ते पाहण्यात मग्न होते. आता शिवसेनेचे नेते असलेले आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते रामदास कदम हे शर्मिला हॉटेलमधल्या आमच्या शेजारच्याच रूममध्ये राहत होते. इतर अनेक नवे कार्यकर्ते येऊन आपल्या राहण्याच्या सोयीवर आक्रमण करू पाहताहेत हे पाहिल्यावर रामदास कदम हे ‘मानापमाना’ चा खेळ सुरू करून बॅगा घेऊन निघाले होते. ‘‘तुमच्या निवडणुका तुम्ही लढवा. मी चाललो खेडला’’, असे बाणेदार उद्‌गार काढून ते निघाले. तेव्हा ज्येष्ठ - कनिष्ठतेचा वाद बाजूला सारून राज स्वत: समजूत काढून कदमांना परत घेऊन आला. शिवसेनेच्या इतिहासातल्या सारगर्भ दिवसात मी निवडणूक क्षेत्रात राजसोबत होतो. त्या क्षणी सभोवतालच्या परिस्थितीचं अचूक राजकीय आकलन त्याच्याएवढं दुसर्‍या कोणत्याच शिवसेना नेत्याला नव्हतं. त्या काळात राजने शिवसेना सोडण्याचं ठरवलेलं होतं अशा वावड्या नंतर उडवण्यात आल्या. खरं तर त्या काळात राजने कमालीचा संयम पाळला होता. जो पाळणं हे कमालीचं कठीण होतं. एक तर संपूर्ण निवडणूक मोहिमेची आखणी ही राजला वगळून करण्यात आलेली होती. दुसरं म्हणजे, त्याला राणेंशी लढवून एकंदरीत महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवावा अशी पुढच्या काळासाठीची संकल्पना शिवसेनेत आकारत होती. राजला हे कळत होतं. तो प्रचंड अस्वस्थ होता. गंमत म्हणजे त्याची ही अस्वस्थता राजकीय असुरक्षिततेतून आलेली नव्हती, तर त्याला त्रास होत होता तो भावनिक. संपूर्ण शिवसेना आणि शिवसेना नेते हे कमालीच्या राजकीय असुरक्षिततेने भेदरलेले होते.

राजला त्याबाबतीत मात्र कधीच काही असुरक्षितता नव्हती. त्याचा स्वत:च्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. पण त्या काळात त्याची भावनिक आंदोलनं ही त्याच्या जवळच्यांना प्रचंड अस्वस्थ करत होती. तेव्हा आणि त्यानंतरच्या अनेक रात्री राजने जागून काढलेल्या आहेत. त्याच्या मनात विचार फक्तं बाळासाहेबांचाच असे. He loves me, He loves me not... असं काहीसं त्याच्या मनाशी चाललेलं असे. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम नाहीए... अशा मानसिक आंदोलनात त्याने इतक्या शक्यतांचा विचार केला होता की मला नाही वाटत की, त्याच्या राजकीय आणि व्यक्तिगत शत्रूंनी बाळासाहेबांसंबंधी त्याच्या एक लक्षांश विचार केला असेल. अगदी निष्पक्षपणे, नीरक्षीरविवेक ठेवून आणि ईश्वराला स्मरून जर मी लिहायचं ठरवलं, तर मी बाळासाहेबांसोबतच्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वातल्या पहिल्या वर्तुळातल्या प्रत्येक माणसाला त्या काळात अगदी जवळून पाह्यलंय. मी नि:संदिग्धपणे असं म्हणेन की, बाळासाहेबांवर राजइतकं निस्सीम आणि इतकं परिपक्व प्रेम इतर कुणीही केलेलं नाही. मुख्य म्हणजे त्याच्याइतके बाळासाहेब कुणाला नीट कळलेच नाहीत. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या चुकांसहित राजने त्यांना समजावून घेतलं आणि निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम केलंय.

More on this topic

काही आधुनिक उखाणे..



MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
=========================

अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
=========================
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
=========================
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून
=========================
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर…
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर
=========================
एक होती चिऊ एक होती काऊ…
***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ…
=========================
कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा …

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस
=========================
कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र
—–नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
=========================

ईवले ईवले हरिण, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले की काय…….
=========================

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
=========================
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे
=========================
बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या
=========================
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
=========================
आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार
कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क
=========================
रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल
=========================
बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
*****राव बिड्या पितात संडासात बसून
=========================
आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……

आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..
=========================

Saturday, June 12, 2010

भिगी भिगी ऋत मे...

गाजलेल्या पावसाच्या गाण्यांच्या या आठवणी.

.............

मुसळधार पाऊस कोसळतोय. रस्त्यावर शुकशुकाट. अशा रोमँटिक वातावरणात अमिताभ आणि स्मिता पाटील बेभान झालेत. पांढऱ्या शुभ्र साडीतली, चिंब भिजलेली स्मिता पाटील हातागाडीवर पहुडलीय आणि 'आज रपट जाये तो...' या गाण्यावर ठेका धरत बच्चन हातगाडीला धक्का मारतोय ...'मंझिल' सिनेमातील अमिताभ आणि मौसमी चटजीर्चं 'रिमझिम गिरे सावन' हे गाणंही असंच ओलेतं. पावसातली गाणी आठवायची म्हटली की ही दोन गाणी हटकून नजरेसमोर येणारच...हिंदी सिनेमात ज्याप्रमाणं होळी-दहिहंडीची गाणी अजरामर झालीत, त्याचप्रमाणं पावसातल्या बेधुंद गाण्यांच्या सरीही तनामनाला भिजवतात.

हिंदी सिनेमांमधल्या पावसाच्या अनेक गाण्यांचा ठसा आजही कायम आहे. बाहेर पाऊस कोसळत असताना घरात टी.व्ही.वर ही गाणी लागली की डबल धमाका. 'नमकहलाल' सिनेमातलं आज 'रपट जाये' आणि 'मंझिल'मधलं 'रिमझिम गिरे सावन' या गाण्यांना अजून तरी तोड नाही. भिजून चिंब झालेली, ओली साडी अंगाला घट्ट चिकटलेली, थंडीनं थोडी कुडकुडणारी मधुबाला आणि 'एक लडकी भिगी भागी सी...' असं म्हणत तिच्यावर डोरे टाकणारा किशोर कुमार या दोघांवर चित्रीत झालेलं गाणं तर अप्रतिमच.

मुमताज आणि राजेश खन्नाची पावसातली गाणी तर बोलायची सोय नाही. मुमताजचं मुरडणं एरव्ही पण वेड लावणारंच होत. पावसात भिजल्यानंतर तर ते मुरडणं आणखीनच मादक दिसायचं. 'रोटी' सिनेमातलं या दोघांचं गाणं आठवून तर बघा. काळ्या साडीत पावसात भिजत चेहऱ्यावर विविध विभ्रम दाखवत मुमताजनं ते गाणं हिट केलं होतं. हातवारे आणि मान थोडी तिरकी करत चिकण्या चोपड्या राजेशनेही तिला लाजून चूर व्हायला लागलं होतं. राज कपूरचं प्यार हुआ इकरार हुआ...या गाण्यातलं वातावरण तर अप्रतिम होतं. भरतभूषण आणि माला सिन्हाचं 'जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात', खिडकीत उभं राहून, बाहेर कोसळणारा पाऊस बघत 'ओ सजना... बरखा बहार आयी...' अशी देव आनंदला साद घालणारी साधना, 'बॉम्बे' सिनेमातलं 'तूही रे, तुही रे, तेरे बिना मै कैसे जियू...' ही गाणी खास पावसाळीच.

पावसातल्या गाण्यांमध्ये तरल किंवा स्फोटक असा प्रकार नसतो. ही गाणी कितीही सोबर असली तरी भर पावसात आगडोंब उसळून देणारीच ठरतात. 'मोहरा' सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी...' या गाण्याच्या ओळी गुणगुणायला सुरूवात तर करा. रविना टंडनचा जाळ समोर येतो. त्या आगीत तेल ओतायला अक्षय कुमार होताच की. हा सिनेमा तर हिट झालाच, शिवाय गाणंही. '१९४२ अ लव्ह स्टोरी' सिनेमातील अनिल कपूर आणि मनिषा कोईरालंचं 'रिमझिम रिमझिम...' हे गाणं सॉलिड रोमँटिक होतं. 'गुरू' सिनेमात 'बरसो रे मेघा मेघा' या गाण्यात ऐश्वर्यानं भरपावसात दिलखेचक अदा दाखवली होती. 'लगी आज सावन की फिर वो झडी है...' या गाण्यात विनोद खन्नाचं रांगडेपण खुललं होतं. 'भीगी भीगी रातो में'...'अब के सावन ऐसे बरसे...', 'हाय हाय ये मजबुरी...' ही पावसाळी गाणी आजही चलनात आहेत. मराठी सिनेमात पावसाची अशी फारशी गाणी नाहीत. 'सर्जा' सिनेमातलं 'चिंब पावसानं रान झालं आबादानी....', 'रिमझिम पावसाची ऐक ना...' अशी काही मोजकीच गाणी पावसात चित्रीत झाली आहेत.

पावसातला खरा आगडोंब कसा असतो हे बघायचं असेल तर थेट दाक्षिणात्य सिनेमात घुसायचं. दोन वर्षांपूवीर् दाक्षिणात्य चॅनेलवर रात्री अकरा वाजल्यानंतर दाखवली जाणारी पावसातली गाणी चोरून बघितली नाहीत, असा माणूस सापडणार नाही. हिंदी सिनेमात किमान एक सीमारेषा तरी असते. पण दाक्षिणात्य सिनेमात पावसाला संकोच वाटेल असा धमाका असतो. पाऊस धो धो कोसळतोय, हिरो-हिरोईन बेभान होऊन नाचतायंत, अशी गाणी या सिनेमांमध्ये खच्चून भरलेली असतात. त्यामुळेच या गाण्यांना दाक्षिणात्य की मराठी अशी सीमारेषा राहिलेली नाही.

टॉप फाइव्ह

रिमझिम गिरे सावन - मंझिल

टिप टिप बरसा पानी - मोहरा

बरसो रे मेघा मेघा - गुरू

आज रपट जाये - नमक हलाल

प्यार हुआ... - श्री ४२०

Thursday, June 10, 2010

चॅटिंगसाठी खुश्कीचे मार्ग!

सध्या इंटरनेटवर काम करताना चॅटिंगवर जास्त भर दिला जातो. माहितीच्या या महाजालातूत माहिती मिळविण्याऐवजी मित्रमैत्रिणीशी जीटॉक अथवा याहू मेसंेजर अथवा एमएसएन मेसेजरवरून गप्पा मारण्यात अनेकांचा वेळ जातो. हा इंटरनेटचा दुरुपयोग आहे असे म्हटले तर काहीजणांना राग येईल. पुढेमागे 'इंटरनेट : शाप की वरदान' असा विषय निबंधासाठी शाळेत आला तर आशर्य वाटायला नको. असो.

हे चॅटिंग स्वत:च्या मालकीच्या कम्प्युटरवरून होते आहे तोपर्यंत फारसा धोका नाही. परंतु, दुसऱ्याच्या मशीनवरून करत असाल तर तुमचे संभाषण अथवा मेल पासवर्ड तिथे सेव्ह होण्याची शक्यता असते. यासाठी एक काम करा. 'मीबो डॉट कॉम'वर जा. कोणताही ब्राऊझर ओपन करा आणि 'मीबो डॉट कॉम' टाइप करा. याहू, गूगल टॉक, मायस्पेस आणि एमएसएन असे चारही मेसेंजर एकदम दिसतील. तुमचे अकाऊंट जिथे आहे तिथे लॉगऑन करा आणि चॅटिंग करा. तुम्ही एकदा का ब्राऊझर क्लोज केलात की आधीचे सर्व रेकॉर्ड निघून जाईल. मग आपल्या मागावर कोणी आहे का याची काळजी करण्याचे कारण नाही.

आपण काम करताना अनेक फाइल्स सेव्ह करत असतो. बऱ्याच काळानंतर त्या फाइल्स आपल्याला नकोशा होतात किंवा त्यांची खरोखरच आवश्यकता नसते. अशा वेळी त्या आपण डिलिट करायला जातो. परंतु असा मेसेज येतो की 'यू कॅन नॉट डिलिट धिस फाइल बिकॉज इट इज इन यूज'. आपण चक्रावतो. कारण आपण ती फाइल वापरत नाही, तरी ती वापरात आहे असे कम्प्युटर साांगतो. अशा वेळी कंट्रोल ऑल्ट डिलिट एकदम दाबून विंडोज टास्क मॅनेजर ओपन करा. ती विशिष्ट फाइल वापरात आहे का ते बघा. कारण तुमच्या नकळत बॅकग्राऊंडला शेकडो फाइल्स कार्यरत असतातच. विंडोजच्या अशा फाइल्स चालू राहणे अपरिहार्यच असते. टास्क मॅनेजर ओपन झाला तर प्रोसेसेसवर क्लिक करून कायकाय चालू आहे ते पाहा. तुम्हाला नको असणारी फाइल क्लिक करून 'एंड प्रोसेस' असे म्हणा. टास्क मॅनेजर बंद करा आणि मग तुम्हाला जी फाइल डिलिट करायची आहे ती डिलिट करा. एवढे करूनही ती डिलिट होत नसेल तर मशीन रिस्टार्ट करून पाहा. या संदर्भात 'अनलॉकर' नावाचा चकटफु प्रोग्राम डाऊनलोड करता येतो. हा प्रोग्राम तुम्हाला हवी असलेली फाइल रिलिज करतो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. टास्क मॅनेजरमधील कोणती प्रोसेस थांबवायची याची पक्की माहिती असल्याशिवाय ती थांबवायच्या भानगडीत पडू नका. अन्यथा विंडोज सिस्टिम बिघडण्याची शक्यता असते.

आपण एखाद्या ब्राऊझरमध्ये काम करत असताना तो अचानक स्लो चालायला लागतो आणि मग 'काल तर बरा होता', असे म्हणण्याची पाळी येते. यातले गुन्हेगार हे ब्राऊझरमधले अॅडऑन्स आहेत. हे अॅडऑन्स पी असले तरी ब्राऊझरचे वजन वाढवतात. एखाद्या वाहनात जिथे पाच माणसे बसू शकतात तिथे भरपूर वजनाची दहा माणसे बसविली की अनावश्यक वजनामुळे गाडी स्पीड घेत नाही. तसेच ब्राऊझरचे आहे. म्हणून अनावश्यक अॅडऑन्स डिलिट करणे आवश्यक आहे. तुम्ही आयई वापरत असाल तर एक काम करा. टूल्सवर क्लिक करून मॅनेज अॅडऑन्स आणि मग एनेबल ऑर डिसेबल अॅडऑन्सवर जा. तुमच्या ब्राऊझरमध्ये कोणकोणते प्लगइन्स वा इतर प्रोग्राम डाऊनलोड झाले आहेत ते पाहा. अनावश्यक प्रोग्राम डिसएबल करा. ते डिलिट करण्याची गरज नाही. मोजके आवश्यक अॅडऑन्स ठेवले तर ब्राऊझर पुन्हा वेगाने काम करायला लागेल.

Long live Bachelors - A compilation

Long live Bachelors


Don't marry for money;

you can borrow it cheaper.

--Scottish Proverb




I don't worry about terrorism.

I am married for two years.

--Sam Kinison


Men have a better time than women;

for one thing, they marry later;

for another thing, they die earlier.

--H. L. Mencken




When a newly married couple smiles,

everyone knows why.

When a ten-year married couple smiles,

everyone wonders why.


Love is blind but marriage is an eye-opener.


When a man opens the door of his car for his wife,

you can be sure of one thing:

either the car is new or the wife.


I take my wife everywhere,

but she keeps finding her way back to home always.

--Anonymous


I asked my wife,

"Where do you want to go for our anniversary? "

She said, "Somewhere I have never been!"

I told her, "How about the kitchen?"

--Anonymous



We always hold hands.

If I let go, she shops.

...cool one...


My wife was in beauty saloon for two hours.

That was only for the estimate.

--Anonymous


She got a mudpack and looked great for two days. Then the mud fell off.

--Anonymous



She ran after the garbage truck, yelling,

"Am I too late for the garbage?"

Following her down the street I yelled,

"No, jump in."

--Anonymous




If your dog is barking at the back door and your
wife yelling at the front door, who do you let in first?

The Dog of course...

at least he'll shut up after u let him in!

--Anonymous




A man placed some flowers on the grave of his

dearly parted mother and started back toward

his car when his attention was diverted to another

man kneeling at a grave. The man seemed to be
praying with profound intensity and kept repeating, 'Why did u have to die? Why did you have to die?"

The first man approached him and said,

"Sir, I don't wish to interfere with your private grief, but this demonstration of pain is
more than I've ever seen before. For whom do you mourn so deeply? A child? A parent?"

The mourner took a moment to collect himself, then replied "My wife's first husband."




A couple came upon a wishing well.

The husband leaned over, made a wish and threw in a coin.
The wife decided to make a wish, too.

But she leaned over too much, fell
into the well, and drowned.

The husband was stunned for a while but then
smiled "It really works ! "

Marathi PJ अत्यंत भयानक पी जे

अतीभयानक पीजे
------------------------
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------






पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
......
......
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------









शंकर भगवान: भक्त, मी तुझ्या तपस्येने खुष झालो आहे, बोल काय पाहिजे?
भक्त: महादेवा, मला डी.जे. सिस्टीम हवी आहे..
शंकर भगवान: अरे मूर्खा!! डीजे सिस्टीम असती तर मी डमरू का वाजवला असता?
------------------------















एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------







मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------











दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी ॅडमीट असतात...
.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
.
.
.
आली बाबा !!
------------------------





लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तोफोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
------------------------





जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------







एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------







गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय नाय!!!"
-----------------------






पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात ....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------







मुंगी भारी की आपण भारी?
उत्तरः मुंगी भारी..
कारण, मुंगी आपल्या चावू शकते, पण आपण मुंगीच्या चावू शकत नाही..
-----------------------






जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
.
.
.
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
-------------------------














चंद्रावर पाणी सापडले आहे!!!
.
.
.
.
.
ग्लास, चकना आणि खंबा घेउन लवकर या ...
--------------------------













शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांचा काय उपयोग केला??
.
.
.
राज्य करण्यासाठी??
.
.
नाही ..
.
.
विचार करा..
.
.
सोप्पय...
.
.
कुलुप उघडण्यासाठी !!
---------------------
















मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का??
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात ...!!"