Thursday, September 23, 2010

राष्ट्रकुल स्पर्धेचे आता वाजले की "बारा" ssss...

Hello friends this is just for your information...


राष्ट्रकुल स्पर्धेला आता फक्‍त काहीच दिवस राहिले असताना दिल्लीत क्रीडाग्राम येथे बांधण्यात येत असलेला पूल कोसळला. जवाहरलाल नेहरु मैदानजवळील हा पूल कोसळल्याने २३ कामगार जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची स्थिती गंभीर आहे.

स्पर्धेसाठी मैदानाजवळ एक ९५ मीटर लांब असलेला पादचारी पूल बांधण्यात येत होता. जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि पार्किंग स्लॉट यांना जोडण्याचं काम हा पूल करणार होता. चंदीगढ येथील पीएन इन्फ्रा कंपनीकडे हे काम देण्यात आले होते. काम शेवटच्या टप्प्यात असतानाच पूल कोसळला. या प्रकरणी दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशीचे आदेश दिले आहे.

अग्नीशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुलासाठी क्राँकीट मिक्स ओतण्याचे काम करीत होते. त्याचवेळी दुर्घटना झाली.

राष्ट्रकुल खेळांचे उद्धाटन समारंभ तसंच समारोप समारंभ होणा-या जवाहरलाल नेहरु मैदानाजवळच हा पूल आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना म्हणजे शरमेची बाब असल्याचे दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राकेश मिश्रा यांनी सांगितले.

क्रीडाग्राममधल्या अपु-या निवास व्यवस्था, खेळांसाठीची अपुरी सुरक्षा तसेच दिल्लीतली अस्वच्छता आणि वाढती रोगराई यामुळे अनेक खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. आज त्यात थाळीफेक हा खेळ खेळणा-या डॅनी सॅम्युअलची भर पडली. त्यातच हा प्रकार घडल्याने आणखी विदेशी खेळाडू राष्ट्रकुलकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

Source: MaharshtraTimes

No comments:

Post a Comment