Monday, September 20, 2010

night life...



night life...पुण्यातला एक डिस्को...गाण्याच्या तालावर थिरकणारी बेधुंद पावले....आणि वारंवार अल्कोहोलनी भरले जाणारे ग्लास...'डीजे'ला प्रोत्साहन देणारे हातवारे, सिगारेट्सचा धूर...

night life...ऑपरेशन थिएटरकडं आशेने पाहणारे डोळे...हात जोडून देवाला साकडे घालणारी आज्जी...यश मिळू देत, अशी प्रार्थना करणारे डॉक्टर्स आणि जीवन-मरणाच्या लढाईत झुंजणारा रुग्ण...

night life...सकाळी जेवायला दोन घास मिळावेत म्हणून आपल्या चंद्रमौळी, पत्र्याच्या घरातील पिल्लांचा निरोप घेउन रात्रीचे खोदकाम करायला जाणारा कामगार...

night life...'माझे बाबा साधे कारकून आहेत...पगार खूप कमी आहे...माझ्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी ते रात्रभर चित्रं काढतात आणि विकतात...' याची जाणीव बाळगून दिवस-रात्र अभ्यास करणारा एखादा विद्यार्थी...

night life...आईचं खूप मेजर ऑपरेशन झालंय आणि बाबा लहान असतानाच गेले...म्हणून कॉल सेंटरमध्ये काम करून घर चालवणारी कर्तृत्ववान आणि जबाबदार मुलगी...

प्रत्येकाच्या आयुष्यात रात्री झोपायचं सुख असतंच असं नाही...काही जण रात्री मजा करतात तर काहींना परिस्थिती जागायला लावते. रोज सकाळी गरमागरम चहाबरोबर आपल्याला खुसखुशीत बातम्यांचा आहार मिळावा म्हणून रात्रभर जागून न्यूज कव्हर करणारे पत्रकार असोत किंवा योग्य वेळेला रुग्णांना मेडिसिन्स मिळावेत म्हणून रात्रभर जागून औषध दुकानांमध्ये काम करणारे काका असोत...यांची night life ही फक्त दुसऱयांसाठीच असते...

बाइक्स रेस करत शहर पालथे पाडणारी तरुणाई एकीकडे आणि रात्रभर जागून कुटुंबाकरता कमवणारी तरुणाई एकीकडे...फरक कळण्याइतके शहाणे आपण असतोच. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपल्या सोयीसाठी जागणाऱया या लोकांच्या प्रती आपण कृतज्ज्ञ असायला पाहिजे. पण आपण प्रीफर करतो ते डिस्कोमध्ये जाणारे श्रीमंत मित्र...आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करणाऱया या मुलांचे जीवन आपल्याला तितकस फॅसिनेटिंग वाटत नाही...मग आपण त्याला अभ्यासू कीडा किंवा 'he is so geeky' वगैरे विशेषणं देतो. त्याचवेळी आपले आई-वडीलही तितकेच कष्ट घेतात हे मात्र विसरतो...आपण ज्या शहरात राहतो तिथे हजारो लोक अशी लाईफ जगतात. जिथे आपण सुखाची झोप घेतो तिथे एकेकाळी जागून, कष्ट करून वास्तूचा पाया कोणीतरी उभारलाय याची जाण विसरतो...

अंधाऱया आयुष्यात आशेचे किरण भरण्याकरिता night life...जगणारी लोक खरंच महान काम करतात. कधीतरी थोडा वेळ काढून असे मित्र बनवा, त्यांच्याशी बोला...म्हणजे तुम्हालाही पटेल की आयुष्यात खरे थ्रीलिंग अनुभव काय व कसे असतात...


- निवेदिता अत्रे

Source: eSakal

No comments:

Post a Comment