Thursday, August 26, 2010

फेसबुकच्या यशापल्याड...


इंटरनेटकरांनीच घडवलेली, इंटरनेटकरांना माहीत असलेली एक बातमी नुकतीच अधिकृतरित्या जाहीर झाली. ती म्हणजे भारतात सोशल नेटवर्किंग साइटमध्ये जो पहिला नंबर
ऑर्कुटचा होता, तो फेसबुकने हिरावून घेतला. फेसबुकचे हे यश नक्की कशात आहे, याचा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा.

माणसांना भेटण्यासाठी गावात चावडी असायची... शहरात हीच जागा नाक्यांनी घेतली... पण ऑॅनलाइनच्या जगात ही जागा मिळाली ती सोशल नेटवकिर्ंग साइटना... चावडी किंवा नाक्यापेक्षा कित्येक पटींनी मोठ्या असलेल्या या जगाची ओळख खऱ्या अर्थाने ऑॅर्कुटने करून दिली. पण ऑॅर्कुटचे हे राज्य संपत असून सध्या बोलबाला आहे तो फेसबुकचा. ऑॅर्कुटने आपली लोकप्रियता का गमावली आणि फेसबुकने का मिळवली याचे साधे सोपे उत्तर म्हणजे फेसबुकने दिलेली भन्नाट फीचर्स. ती फीचर्स कशी ऑॅर्कुटपेक्षा वेगळी आहेत, हा इथे चचेर्चा विषय नाही. पण फेसबुकच्या या यशाचा उपयोग आपण नक्की कसा करणार आहोत याचा गंभीरपणे विचार करायला हवा.

या सोशल नेटवकिर्ंग साइटमधून टाइमपास वजा केला तर अशा अनेक गोष्टी करता येतील, ज्या करण्यासाठी आजवर आपण कोट्यवधी रुपये खर्च केलेत. उदाहरण द्यायचे तर देशातील विद्यापीठे जोडण्यासाठी आपण आजपर्यंत कित्येक बैठका घेतल्या आहेत. पण सोशल नेटवकिर्ंगचा वापर करून विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सुरूही केला आहे. गरज आहे ती त्याला नीट दिशा देण्याची. नेमके इथेच एक धोरण ठरवण्यात आपण मागे पडत आहोत. फेसबुकवर फार्मविले हा गेम प्रचंड लोकप्रिय आहे. इंटरनेटवर शेती करण्याचा हा खेळ. जर हा खेळ लोकप्रिय होऊ शकतो तर खरी शेती करणारा शेतकरी का आत्महत्या करतो? त्या शेतकऱ्याला योग्य ती माहिती, मदत इंटरनेटचा वापर करून पुरवली गेली तर कदाचित खरी शेतीही लोकप्रिय ठरू शकेल. पण बाजारपेठांचे गणित इंटरनेटवर आणण्यापेक्षा या खोट्याखोट्या शेतीतच आपला तरूण अडकला तर कसे चालेल?

फेसबुककरांनी ठरवले तर क्रांती घडू शकते हे जगभर सिद्ध झालंय. मुंबईकरांनीही त्याची दोन उदाहरणे पाहिली. २६ नोव्हंेबरनंतर गेटवेवर जमलेली लाखांेची गदीर् आणि टॅक्सी-रिक्षाच्या आंदोलनला फुटलेली वाचा हे या फेसबुकचेच यश होते. फक्त अजूनही आपण त्याचा प्रभावी वापर करू शकलो असे म्हणणे चुकीचे ठरेल. फेसबुकच्या या यशाचा नीट विचार करून आपण आपल्या देशाच्या म्हणून असलेल्या गरजा हेरल्या पाहिजेत. या देशातील तरूणाईची भाषा असणाऱ्या या जगाकडून नांेदी काढून आपण आपले युवा धोरण आखले पाहिजे. एवढेच नाही तर या तरुणांना एकमेकांशी जोडून त्यांची एक चळवळ उभारली पाहिजे.

फेसबुकच्या यशाचे गमक शोधताना एवढे नक्की जाणवते की त्याने मला काय वाटतेय हे जगाला सांगण्याचे व्यासपीठ ऑॅर्कुटपेक्षा मोठे केले. पण फेसबुक हे काही अंतिम नाही. हे व्यासपीठ जर अन्य कोणी आणखी मोठे केले तर कदाचित फेसबुकही मागे पडेल. शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगितलेले चिरंतन सत्य इंटरनेटच्या दुनियेलाही तंतोतंत लागू पडते. ते म्हणजे, इथे काहीच कायम नाही. जे आज एकाचे आहे ते उद्या आणखी कुणाचे तरी असेल, परवा आणखी कुणाचे तरी...त्यामुळे ते कुणाचेही असले तरी आपण त्याचा कसा वापर करणार हेच महत्त्वाचे.

Source: Maharashtra Times

1 comment: