औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
.... आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!
मग तुझे काय?
"हा शर्ट किमती दिसतोय?"
"तो माझा नाही !"
"पॅन्ट पण छान आहे ..!"
"तीही माझी नाही ..!!"
"मग तुझे काय आहे..?"
"लौन्ड्री ...!!!"
दारु
पोलिस - दारुड्यासः ईथे का उभा आहेस?
दारुड्या - तोल सांभाळीतः यावेळी सारे शहर माझ्याभोवती फीरत आहे. माझे घर आले की मी घरात घुसेन ..!
अपघात
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?
बाई: नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, गळ्यात मोत्याची माळ होती..आणि ... तिचं लिपस्टिक मात्र तिला मुळीच शोभुन दिसत नव्हतं ..!
वजाबाकी
पहिला: लोकांनी उगाचच त्या माधुरी दिक्षीतला डोक्यावर बसवुन ठेवलंय. तिचा रंग, थोडासा अभिनय, जरा नाक-डोळे सोडले तर उरते काय?
दुसरा: माझी बायको!
हसवा फसवी ..!
नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
******************************************************************************************
तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम - सीता दाखवू शकतोस का ? नाही ना ? ॥
अरे वेड्या, फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही !!!!
******************************************************************************************
आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो !!!
******************************************************************************************
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... .. का?
.. अंगात मस्ती, दुसरं काय?
******************************************************************************************
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
******************************************************************************************
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
******************************************************************************************
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?'' त्यानं उत्तर दिलं, '' पाहिलं. '' कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''
'' आपले बाबा !!!! ''
हसा लेको ..!
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgia1AlIbz9MsNZEzJg_1Qzhxbz73Vi89SrJhcilQBzy5grmLLF66JlgooJ8iu5CkPMpLEcocEqOVVPxjSbUJKeu9HscZZbqhpNCXU6HHUyy6ae4MVNmg2HH2vUTIL30gMaek1mMMX6AhgM/s1600/hasaa.jpg)
मराठी विनोद ...
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3GlRRl7XzfY5-xRzcuyrhwmrELpkD9WSPlIeCPvg3O30U_2rOJNAXQ50njEEwOmYNAoZnVRwUaPOIxoi3rdHhJ9ILLoqyoozmG1w5uPzarPVKKf-phOa9Vf8Z8gHzfao6DHH3dppzzR_P/s1600/joke.jpg)
HA ha ha Laay bhari
ReplyDeleteYamaraj che tar khupach bhari